धरणातून अचानक पाणी सोडल्याने शेतकरी गेला वाहुन

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): बोरदहेगाव धरणातून कोणतीही पूर्वकल्पना न देता मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने करंजगाव येथील शेतकऱ्याचा बैलगाडी आणि गायीसह नदीपात्रात वाहून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भानुदास गंगाधर मगर (वय ७४) असे
मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

या दुर्घटनेत सुदैवाने बैल
बचावले, मात्र शेतकरी आणि गाय दगावली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा पाणी सोडण्याला विरोध होता. असे असतानाही, जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पाटबंधारे व जलसंपदा विभागाने सोमवारी दुपारी पोलिस बळाचा वापर करून धरणातून बोर नदीपात्रात विसर्ग सुरू केला.

मात्र, नदीकाठच्या गावांना किंवा शेतकऱ्यांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शेतकरी भानुदास मगर हे बोर नदी ओलांडून आपल्या शेतात गेले होते. सार्यकाळी त्यांना नदीत पाणी सोडल्याची अजिबात माहिती नव्हती.

पाण्याचा अंदाज न काळी घराकडे परतताना आल्याने नदी ओलांडताना त्यांची बैलगाडी आणि गाय पाण्याच्या जोमदार प्रवाहात वाहून गेली. या
रात्री करंजगाव येथील प्रामस्थ आणि तरुणांनी नदीपात्रात शोध घेतला भानुदास मगर यांचा मृतदेह समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यांची गायही पाण्यात बुडून मृत झाल्याचे स्पष्ट झाले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यामुळेच भानुदास मगर यांचा नाहक बळी गेला आहे, असा संताप व्यक्त करत करंजगावचे ग्रामस्थ, मनाजी मिसाळ आणि बाजार समितीचे संचालक प्रशांत सदाफळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. 

या निष्काळजीपणाला जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी यांच्यावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.